Sunday, December 30, 2007

२. चौल रेवदंड्याचा इतिहास (आमंत्रित लेख)


आमच्या एका खास दोस्ताकडून हा लेख:
सादरकर्ते श्री. प्रणय घरत.

चौल-रेवदंडा या परिसराचा इतिहास अलौकिक असून हा भाग पूर्वी एक नगर म्हणून ओळखले जात. या नगरात चौही बजुस चाफ़ा फ़ुललेला असायचा म्हणून या नगराला चम्पावती सुद्धा म्हणतात.कोणी चम्पा राजाची नगरी म्हणून तिला चम्पावती असे म्हणत.कालन्तराने चेउल ज़ाले व आजचे हे "चौल".
चौलचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे.या नगरीच्या अनेक कथा आहेत.येथे प्रत्यकष्य प्रभू रामचंद्रानी श्री शिवशंकरांच्या नावाने या लिन्गाची स्थापना केली.या लिंगास ’रामेश्वर’ असे म्हणतात.


या रामेश्वराशिवाय अग्नि,वायु आणि पर्जन्य अशा तीन दैवतांची जाग्रुत केन्द्रे आहेत.याना यज्ञकुन्डे म्हणतात.ही मन्दिरात असलेली बन्द कुन्डे बिकट प्रसंगी उघडून यज्ञ केल्यावर सन्कट निवारण होते असे सांगतात. (चित्रात: त्रिपुरी र्पोणिमेला रामेश्वर परिसर असा उजळून निघतो)

पूर्वी नगर भरभराटीत होते.तेव्हा या नगरीत तलम कापड,तांब्यापितळॆची सुबक भान्डी इतर कौशल्य्पूर्ण वस्तु तयार होत.बांगड्यांचाही व्यापार मोठ्या प्रमाणात चालत असे.प्राचीन काळी चीन व भारत यांच्यात व्यापराची देवाण्घेवाण करणारे चौलचे रेवदंडा बन्दर पहिले होय.
उत्तर कोकणातील शिलाहार राजवन्शाचा चौलशी निकट संबंध होता. इ.स. ८०० चे सुमारास कपर्दीन शिलाहार नामक राजाने या नगरीत काही गुप्त भुयारे खणलेली होती.अशा दोन गुम्फ़ा दत्तटेकडीवर पूर्वेला हनुमान पाडा गावाच्या वरच्या बाजुला आजही दिसतात.शिलाहार राजवंशात जे राजे गाजले त्यात अरिकेसरी उर्फ़ केशीदेवी यांच्या ताब्यात चौदा हजार गावे होती.पुढे अनंतदेव राजा झाला त्याने मुसलमानांपासून कोकण वाचवले.
याच चौल नगरित एका काळी राजाने या सुन्दर नगरीचे एका रात्रीत काशीक्षेत्र बनविण्याचा संकल्प करून पहाटे कोम्बडा आरवण्यापूर्वी काशीत जेवढी देवळे आहेत तेवढी देवळे उभारण्यास सुरवात केली.पण काही किमया होऊन पहाट होण्यापूर्वीच कोम्बडा आरवला म्हणून चौलनगर काशीनगर बनू शकले नाही.कोंबडा आरवेपर्यन्त राजाने तीनशे सात देवळे व तेवढेच तलाव बांधले.या गोष्टीमुळे या चौलनगरीला देवनगरी असे नाव पडले होते. इ.स ११९८ मध्ये येथील भाग पोर्तुगीजांच्या हाती लागला तेव्हा त्यांनी या नगरीचे वैभव नष्ट करण्यास सुरवात केली.काही देवळे पाडून टाकली, काही तलावे बुजवले, राजवाडे नष्ट केले. आज चौलमध्ये पन्नास(अंदाजे) देवळे व तेवढेच तलाव पहावयास मिळतात असे म्हणतात.


२. क्रमश:

No comments: