Sunday, May 11, 2008

चटपटा नजराणा

ढोकळा

साहित्य:
१) २ वाट्या बेसन
२) १ कप आंबट ताक
३) हळद २ चमचे
४) मीठ स्वादानुसार
५) किसलेले आले किंवा सुंठ पाउडर
६) ४ तिखट मिरच्या
७) चिमुटभर हिंग
८) १/४ लिंबू
९) १ चमचा बेकर्स इस्ट.
१०) २ चमचे राई
११) किसलेले खोबरे
१२) कापलेली कोथिंबीर

कृती:
१) २ वाट्या बेसन एका पातील्यात १ कप आंबट ताकामध्ये भिजवावे. दही आंबट नसेल तर त्यात पाणी घालून ताक माइक्रो-ओवन मध्ये १५ सेकंदाकरीता गरम करून वापरावे.

२) त्यात हळद, मिरच्या, किसलेले आले, मीठ, १/४ लिंबू पिळून मिक्सर मध्ये चांगले फेटून घ्यावे.

३) इडली मिश्रणासारखेच हे मिश्रण देखील घट्ट असावे.

४) त्यात १ चमचा बेकर्स इस्ट टाकून मिश्रण १ तासासाठी बाजुला ठेवावे.

५) १ तासाने, एका मोठ्या पातील्यात पाणी उकळायला घ्यावे.

६) दुस~या एका (आतून सुक्या) लाहान भांड्याला आतून तेल लावावे.

७) त्यात थोडेसे हे मिश्रण (जेणेकरून फक्त तळ झाकला जाईल) ओतावे.

८) आता हेच भांडे मगाच्या उकळत्या पाण्यात ठेवावे. मिश्रणात पाणी जाऊ नये याची दक्षता घ्यावी.
डबल बोइलर पद्धत, जी आपण मोदक बनवायला वापरतो.

९) वरून झाकण ठेवावे.

१०) १० मिनीटांनी ते मिश्रण वर फूगून येइल. आत सुरी घालून पहावी. सूरी सुकी बाहेर आली की झाले, नाहीतर थोडे ज्यास्त वेळ ठेवावे, किंवा पुढील खेपेत मिश्रण कमी वापरावे.

११) गस बंद करून, १० मिनीटांसाठी ते मिश्रणाचे भांडे बाजूला ठेवावे. आणि नंतर सुरीने कापावे व अलगद पिस काढावेत.

१२) ढोकळा पिसेस वर राईची फ़ोडणी द्यावी. वरून किसलेले खोबरे, कोथिंबीर व गोड-तिखट चटणी सोबत सर्व करावा.