Monday, December 31, 2007

४. जिनकी कहानी, उन्हीकी जुबानी.

विशेष आभारी आहोत !
ह्या स्नेह संम्मेलनाच्या आयोजनकर्त्या खुद्द सौ. सुजाता वासुदेव यांच्याकडून हा लेख:
आमच्या घरी ओर्कुटची मंडळी येणार आहेत असे साहेबानी मला सांगीतल्यावर प्रथम वाटलेकी ही अनोळखी मंडळी कशी असतील? पण मग म्हटले ..पाहुया तर यांचे ओर्कुटयम कसे आहे ते ? तसे मी मंदारच्या आई-वडिलांना त्रिपुरी पोर्णिमेच्या दिवशी भेटले होते. तसेच प्रणयसह ही भेट झाली होती. मुलगा होतकरू व अज्ञेतला वाटला. ज्या दिवशी यांचे ओर्कुटया नमः एकत्र येऊन स्नेह सम्मेलन करणार हे जेव्हा मला कळले, मी नेहमी प्रमाणे त्यांच्या स्वागतसाठी तयार झाले, कारण आमच्या साहेबांचा बोलका व मोकळा स्वाभाव सतत कुणा कुणाशी नविन नविन ओळखी व गप्पा मारायचा आतोनात शौक.
माझे मात्र त्याप्रमाणे फ़ारच मोजके बोलणे. तसा अह्माला मुंबईहून निघवायास थोडा उशीर झाला. तरी ही मुंबईच्या ट्रैफिक जाम मधून वाट काढत आह्मी दिलेल्या वेळापेक्षा थोडेसे उशिरा चौलास पोहोचलो. गेल्या बरोबरच उळे दांपत्य आम्हाला भेटले व आम्ही नेहमी प्रमाणे त्यांचे आदरतिथ्य केल्यानंतर थोड्या वेळात सहेबांची ओर्कुट्वरील इत्तर सवंगडी येण्यास सुरवात झाली प्रत्येकाबरोबर साहेब माझी ओळख करून देत होते. मग ती मंडळी ऑरकुटच्या चर्चेत रममाण झाली. साहेबंचा ऑरकुट हा विषय मनाला व डोक्याला विरंगुळाचा असल्यामुळे मी त्यांच्या ह्या ओर्कुटायण बाबतीत जस्त्ता कधी पाहिले नाही. तरी ती मंडळी अल्यावर मला त्यांच्याबद्दल आपलेपणाच वाटला. सौ. उळे व मी खूप गप्पा मारल्या त्यांची आणि माझी इत्तर आमच्या मित्रांकडून ओळखी निघाल्या व आह्मी अधिक मोकळे पणाने बोललो. त्यांचा चिमुकला तर फारच छान होता.
त्या दिवशी रात्रीचे बंधन असल्यामुळे सर्वांना आपले ओर्कुटायान अवरते घावे लागले.

(क्रमश:)

३. चौल-रेवदंड्याची प्रसिध्द श्री. दत्त यात्रा (आवर्जुन वाचा)

श्री. दत्त जयंती निमीत्त आमच्या लाडक्या सदस्याकडुन हा आवर्जुन वाचण्यायोग्य लेख :
सादरकर्ते श्री. अतुल पाटील.



ओर्कुटवरील चौल रेवदंडेकरांची सभा संपुष्टात आल्यावर मी माझ्या मित्रासमवेत वसुदेवांचे घर मागे टाकून, आमच्या घराच्या दिशेने निघालो. दुसर्या दिवशी श्री. दत्त जयंती होती मी सकाळी लवकर उठून डोंगरावर जाणार होतो. घरी आल्यावर सगळ्यांना मी सकाळी लवकर उठण्याची सूचना करून टेरेस वर झोपायला गेलो. मस्त ठंडी पडली होती. वसुदेवानी वोडका देऊन स्वागत केल्यामुळे अंगात अजुन गरमी होती. चटई वर पडल्या पडल्या मस्त झोप लागली. सकाळी हलकीशी जाग आली ती दूरवरच्या कोंबडयाच्या आरवण्याने. घड्याळ पाहिले तर ४:३० वाजले होते. मी उठून बकिच्याना उठवले, कारण १० जनांच्या आंघोळी व्हायला वेळ तर होणाराच होता. भाच्याने मस्त शेगेडी पेटवली आणि त्यावर गरम पाण्याचे भांडे ठेवले. आज शेगेडी वरच्या घन घनत्या पाण्यात आंघोळ करायला मिलणार होती. अश्या पाण्यात आन्घोळ करण्याची मजा काही औरच असते. आणि ते पण सकाळी ५:३० वाजता. अंग मस्त शेकुंन निघते. मुंबईला गीज़र च्या पाण्याला याची टेस्ट नसते. (चित्रात: रामेश्वरी ही सुंदर दत्त मुर्ती)

डोंगरावर जायच्या ओढीने सगळे जण पटापट आंघोळ आटपून तयारीला लागले होते. ७ पर्यन्त सगळे तयार झाले. माझी आणि मामाची तयारी लवकरच झाली असल्यामुळे आम्ही दोघे रामेश्वर मंदिरात जायला निघालो. पाहाटेचा वेगळाच सुगंध हवेमध्ये होता, वसुदेवानी काल संगीताल्याप्रमाणे एक ड़ीप ब्रेथ मी घेतला, मन अगदी प्रसन्न, आणि उत्साही झाले. मी आणखी १०/१२ वेळा तसे केले, नाक एव्हाना मस्त ठंड पडले होते, असे करता करता देउळ गठाले आणि आत गेलो. आत उबदार होते. पुर्वीचे वास्तु-शास्त्र हे किती कल्पक होते, याचे हे देउळ एक प्रात्यक्षिक नमुना आहे. उन्हाळ्यात जेव्हा बाहेर अंगाची लाही लाही होत असते तेव्हा याच मंदिरात एसी सारखा ठंडावा असतो, आणि त्ता बाहेर एवढी ठंडी होती आणि मंदिरात मस्त उबदार वातावरण होते. या मंदिराचे आणखी एक विशेष, उत्तरायण असो वा दक्षिणायन; ९:३० ते १०:३० च्या दरम्यान देवाळाच्या गवाक्षातून सुर्याची किरणे बरोबर महादेवाच्या लिंगावर पडतात.आणखी एक म्हणजे पाणी हे समपतालित राहते हा नियम आहे. पण पोखराणीतले पाणी उन्हाळ्यात कमी असून, शिवलिंगाजवाळील पाणी तसुभर ही कमी होत नाही. मंदिर एकदम पेशावे कालीन बनावाटीचे आहे. मंदिराचे कोरिवकाम देखणे आहे. आत मोठा नगारा आहे, देवाची पालखी आहे, मंदिरात डोळे मिटून बसलो होतो आम्ही. असे वाटत होते एक वेगाळीच शक्ति संचाराते आहे अंगात. एक आणखी विशेषता सांगायची म्हण्जे, मंदिरात अगदी लहान आवाजात बोलले तरी तो आवाज खुप मोठा वाटतो व घुमतो. पूर्वी माइक नहव्ते तेव्हा किर्तनाच्या वेळी बुवांचे शब्द कानावर स्पष्ट पडावेत म्हणुन विशिष्ट बांधकाम शैलीचा उपयोग करून हे मंदिर बांधले असावे असे वाटते. (चित्रात: रामेश्वरी शिवलिंगाच्या सभोवताली हा प्रशस्त गाभारा)

काही वेळाने घरातील सगळे जण आले. त्यांचे देवदर्शन झाल्यावर आम्ही सगळे दत्ताच्या डोंगरावर जायला चौल नाक्याच्या दिशेने निघालो. पुन्हा वसुदेवांचा बंगला रस्त्यात आला. मी वासुदेव कुठे दिसतात का ते पाहिले पण गडाचे दरवाजे बंद असल्यामुळे कोणीच दिसले नहीं. सकाळच्या कोवळ्या सोनेरी सुर्यप्रकशात पांढरा-शुभ्र बंगला सोनेरी रंगात न्हाऊन निघाला होता. मला सहज काल रात्री चंद्र प्रकाशात पाहिलेला बंगला आठवला आणि नकळत लहानपणीचे बडबड गीत ओठावर आले. "असावा सुंदर चोक्लेटचा (वसुदेवांचा) बंगला, चंदेरी, सोनेरी चमचमता चांगला". थोड्याच वेळात आम्ही चौल नाक्यावर पोहोचलो, आम्ही १० जन होतो म्हणून एक पूर्ण सितारा बुक करून आम्ही निघालो. रस्त्यात नजर जाईल तिकडे निसर्गाने पाचू उधळले होते. मधोमध रस्त्याचा काला आखिव पट्टा पोटाखाली घेत सितारा धावत होता. ओळखीची घरे-मंदिरे मागे टाकत आम्ही १० मिनितात भवाले नाक्यावर पोहोचलो.


भवाले नाका मागे टाकून आम्ही मंदिराच्या दिशेने पुढे निघालो. रस्त्यात नेहमिची घरे, झाडे झुडपे दिसत न्हवती. रस्त्याच्या दुतर्फ़ा आज दाटी वाटी ने थाटलेली दुकाने दिसत होती. उसाच्या रस, खेळणी, वडापाव भज्जी, आकाश पाळणे, छोट्या मुलांच्या करमणुकीचे खेळ, अशी नानाविध दुकाने होती, सकाळी सकाळी त्यांची दुकानात माल रचान्याची लगबग सुरु होती. दुकाने मागे टाकून आम्ही डोंगराच्या जवळ पोहोचुंन डोंगर चढायला सुरुवात केली. जसजसे वर जात होतो तस तशी डोंगाराची ठंड बोचरी हवा अंगाला झोम्बत होती. इथेही निसर्गाने सर्वत्र पाचू उधाळले होते. पण आज गजबज जास्त होती. त्यामुळे आज मी या निसर्गाचा जास्त आनंद लुटू शकत नव्हतो. चढताना मध्ये एक जुने वडाचे झाड़ लागले. त्याच्या परम्ब्या खालपर्यंत आल्या होत्या. मला त्या परम्ब्या पकडून झुलण्याचा मोह झाला होता, पण आज डोंगाराच्या पयथ्या पासून वर पर्यन्त भिक्शुकांनी अतिक्रमण केल्यामुळे मोकळी जागा नव्हती. बिक्शुक ओरडत होते "हे दत्ता! दे दत्ता". २० मिनिटात आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचालो. मंदिर ५०/६० स्टेप्स दूर होते. पण इथे एवढी धक्काबुक्की आणि गर्दी होती की त्यामुळे रांग हा प्रकाराच इथे दिसत नव्हता.

रांगेत सगळे मध्ये मध्ये घुसत होते. त्यामुळे रांग संपण्याचे नाव घेत नव्हती. तिथे कुठेही मंदिरसमितिचे सभासद अथवा कार्यकर्ते दिसत नव्हते. माला खूप राग येत होता. शेवटी सहन झाले नाही तेव्हा मी सरळ मध्ये गुसनार्यांना अटकाव केला तर म्हणाले की आमची माणसं पुढे आहेत. मी म्हणालो त्यांच्या बोरोबर जर तुम्हाला वर जायचे असेल तर त्यांना खाली बोलवा, कारण मी कोणालाही अत पुढे जाऊ देणार नाही आहे. माझा आवाज ऐकून त्रासलेले भाविक ही माझ्या मागे उभे राहिले. आता रांग सुरळीत पुढे जात होती. मी मानत ठरवले होते की वर जर कोणी कार्यकर्ता भेटलाच तर त्याला चांगलेच सुनवायचे. रांग पुढे सरकत सरकत मंदिराजवळ आली, इथे तर धक्का बुक्कीचा कहरच होता. लहान मुले अणि महिला यांना खुप त्रास होत होता. कारण डोंगराच्या मागून येणारे भक्त इथे रांगेत घुसत होते. इथे मला हे वाचाकां साठी नमूद करावेसे वाटते की "इथले व्यवस्थापन अतिशय गलथान आहे. ना भक्तांची रांग ना प्रसाद देण्याची काही सोय. भयंकर गलका, प्रसाद फुले पायदळी तुडवले गेल्याने मंदिरात सर्वत्र जमलेला चिकथा. प्रस्तुत देवास्थानाच्या भक्तांच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नाही. परन्तु अतिशय दुर्दैवाची बाब म्हणजे शिस्त आणि भक्ति एकत्र नांदू शकते याची बर्याच ज़नांना समज नसते. हेच पुढे अनुचित घटनांना आमंत्रण देते.

Sunday, December 30, 2007

२. चौल रेवदंड्याचा इतिहास (आमंत्रित लेख)


आमच्या एका खास दोस्ताकडून हा लेख:
सादरकर्ते श्री. प्रणय घरत.

चौल-रेवदंडा या परिसराचा इतिहास अलौकिक असून हा भाग पूर्वी एक नगर म्हणून ओळखले जात. या नगरात चौही बजुस चाफ़ा फ़ुललेला असायचा म्हणून या नगराला चम्पावती सुद्धा म्हणतात.कोणी चम्पा राजाची नगरी म्हणून तिला चम्पावती असे म्हणत.कालन्तराने चेउल ज़ाले व आजचे हे "चौल".
चौलचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे.या नगरीच्या अनेक कथा आहेत.येथे प्रत्यकष्य प्रभू रामचंद्रानी श्री शिवशंकरांच्या नावाने या लिन्गाची स्थापना केली.या लिंगास ’रामेश्वर’ असे म्हणतात.


या रामेश्वराशिवाय अग्नि,वायु आणि पर्जन्य अशा तीन दैवतांची जाग्रुत केन्द्रे आहेत.याना यज्ञकुन्डे म्हणतात.ही मन्दिरात असलेली बन्द कुन्डे बिकट प्रसंगी उघडून यज्ञ केल्यावर सन्कट निवारण होते असे सांगतात. (चित्रात: त्रिपुरी र्पोणिमेला रामेश्वर परिसर असा उजळून निघतो)

पूर्वी नगर भरभराटीत होते.तेव्हा या नगरीत तलम कापड,तांब्यापितळॆची सुबक भान्डी इतर कौशल्य्पूर्ण वस्तु तयार होत.बांगड्यांचाही व्यापार मोठ्या प्रमाणात चालत असे.प्राचीन काळी चीन व भारत यांच्यात व्यापराची देवाण्घेवाण करणारे चौलचे रेवदंडा बन्दर पहिले होय.
उत्तर कोकणातील शिलाहार राजवन्शाचा चौलशी निकट संबंध होता. इ.स. ८०० चे सुमारास कपर्दीन शिलाहार नामक राजाने या नगरीत काही गुप्त भुयारे खणलेली होती.अशा दोन गुम्फ़ा दत्तटेकडीवर पूर्वेला हनुमान पाडा गावाच्या वरच्या बाजुला आजही दिसतात.शिलाहार राजवंशात जे राजे गाजले त्यात अरिकेसरी उर्फ़ केशीदेवी यांच्या ताब्यात चौदा हजार गावे होती.पुढे अनंतदेव राजा झाला त्याने मुसलमानांपासून कोकण वाचवले.
याच चौल नगरित एका काळी राजाने या सुन्दर नगरीचे एका रात्रीत काशीक्षेत्र बनविण्याचा संकल्प करून पहाटे कोम्बडा आरवण्यापूर्वी काशीत जेवढी देवळे आहेत तेवढी देवळे उभारण्यास सुरवात केली.पण काही किमया होऊन पहाट होण्यापूर्वीच कोम्बडा आरवला म्हणून चौलनगर काशीनगर बनू शकले नाही.कोंबडा आरवेपर्यन्त राजाने तीनशे सात देवळे व तेवढेच तलाव बांधले.या गोष्टीमुळे या चौलनगरीला देवनगरी असे नाव पडले होते. इ.स ११९८ मध्ये येथील भाग पोर्तुगीजांच्या हाती लागला तेव्हा त्यांनी या नगरीचे वैभव नष्ट करण्यास सुरवात केली.काही देवळे पाडून टाकली, काही तलावे बुजवले, राजवाडे नष्ट केले. आज चौलमध्ये पन्नास(अंदाजे) देवळे व तेवढेच तलाव पहावयास मिळतात असे म्हणतात.


२. क्रमश:

Friday, December 28, 2007

१. आपले गाव, आपले चौल रेवदंडा कोर्लई साळाव .

!! श्री. गणेशाय नम: !!

















चौल रेवदंडा कोर्लई साळावच्या पहिल्या संकेतस्थळावर आपले स्वागत असो.
या संकेतस्थळावरुन आपल्याला आलिबाग तालुक्यातील चौल, रेवदंडा, कोर्लई, साळाव या गावांची माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. परिवाराचे ओर्कुट संकेतस्थळ http://www.orkut.com/Community.aspx?cmm=18732076 . आपली प्रतिक्रिया ऐकण्यास आम्ही उत्सुक आहोत.
________________________________________________________
रायगड जिल्ह्यातील, अलिबाग तालुक्याच्या अरबी समुद्रकिनारी एकमेकांच्या हाकेवर वसलेली ऐतिहासिक वारसा लाभलेली ही चार गावे. कौलारु घरे, मागे नारळा पोफळीच्या बागा, आणि ह्या शेती-वाड्यांमधून नागमोडी वाट काढत अलिबागहून सुरु झालेला रस्ता, चौल मार्गे, थेट संपतो तो रेवदंड्याच्या किल्ल्यात. साळाव पुलावरुन पलीकडे गेल्यास उजव्या हाताला मुरुड रस्त्यावर लागते कोर्लई, तर डाव्याहाताला लागते साळाव.

मुंबईहून कसे पोचाल ?

(१) कार ने : मुंबईहून पनवेल-पेण मार्गे वडखळ फाट्याहून डाव्या हाताचा गोवा रस्ता (N.H. 17) पकडता, उजवीकडला सरळ रस्ता थेट पोयनाड-कार्लेखिंड मार्गे अलिबागला पोहोचतो. अलिबागहून (गावात न जाता) डाव्या हाताला रेवदंडा-मुरुड रस्ता लागतो. हाच रस्ता आक्षी-नागांव-चौल मार्गे रेवदंड्यात कुंडलीका नदीवर संपतो. रेवदंड्याहून साळावपूलावरुन पलिकडे कोर्लई-नांदगाव मार्गे मुरुडला व साळाव-चणेरा मार्गे रोह्याला जाता येते. (चित्रात: कुंडलिका नदीवरचा साळाव पुल)

(२) बस ने: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी) बसेस नियमीत मुंबई सेन्ट्रलहून परळ-दादर- सायन व बोरिवलीहून गोरेगाव-अंधेरी-सायन मार्गे पुढे मैत्री पार्क (चेंबूर) -वाशी-पनवेल-पेण-अलिबाग मार्गे चौल-रेवदंड्याला जातात. या गाड्या वरील थांब्यावर कोठेही पकडाव्यात. कल्याण/ठाण्याहूनही पनवेल मार्गे काही गाड्या सुटतात. खालील नावफ़लकाच्या गाड्या थेट चौल-रेवदंडयात येतात.

मुंबई/ठाणे/बोरिवली-रेवदंडा, मुंबई/ठाणे/बोरिवली-मुरुड, मुंबई-आगरदांडा, मुंबई-राजपुरी.

मुंबई/ठाणे/बोरिवली-अलिबाग :- अलिबागहून पुढे रेवदंड्यात जाण्यास ८-सीटर शेअर रिक्षा (ग्रामीण भाषेत इकडे सितारा म्हणतात) अलिबाग एस.टी स्टैन्ड मागे पुरेपूर उपलब्ध आहेत.

(३) समुद्रमार्गे: गेट वे ओफ़ इंडिया हून नियमीत क्याटाम्यारन सेवा मांडव्या पर्यंत व मांडव्याहून त्यांचीच बस सेवा अलिबाग पर्यंत उपलब्ध आहे. रात्री (०७.३० नंतर) या सेवा बंद असतात. अधिक माहितीसाठी या संकेतस्थळावर संपर्क साधावा : http://raigad.nic.in/HTMLDocs/transportation.htm

(४) रेल मार्गे: मुंबईहून कोकण रेल्वे मार्गी जाणार्या गाड्या रोहा येथे थांबतात (अलिबाग हे स्टेशन नाही) व रोह्याहून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी) बसेस रेवदंड्याला येतात.

(५) मुंबई हेच नजीकचे अंतराष्ट्रीय विमानतळ आहे.

कोकणातून (माणगाव, रत्नागिरी, मालवण, गोव्याहून) कसे पोचाल ?

गोवा-मुंबई (N.H.17) हायवे वर कोलाड गावाजवळ कोलाड-रोहा जोडरस्ता जातो. त्या रस्त्याने रोहा-चणेरा-साळाव मार्गे रेवदंडा गाठता येते. रोहा हेच नजीकचे रेलवे स्टेशन आहे. कोकणातून काही एस.ट्या रोह्याला देखील संपतात. रत्नागिरी-अलिबाग, पोलादपूर-अलिबाग एस.टी बसेसही उपलब्ध आहेत. या गाड्या वडखळ मार्गे अलिबागला येतात.

दिघीहून राजपुरी खाडी पार केल्यास (लौंच सेवा उपलब्ध आहे) मुरुड मार्गे एस.टी ने किंवा दिवेआगर/श्रीवर्धनहून म्हसळा मार्गे, मांदाड-खाजणी पुलावरुन आगरदांडा-मुरुड मार्गे गाडीने चौल-रेवदंड्याला येता येते.

पुणे-नगरहून

पुण्याहून पुणे-खोपोली-पेण-अलिबाग-मार्गे किंवा पुणे-पाली-अलिबाग/रोहा मार्गे चौल-रेवदंडयाला येता येते.

_________________________________________________________
ओर्कुट वरील चौल रेवदंडा कोर्लई साळाव परिवारबद्दल थोडेसे !
ओर्कुट वरील हा परिवार दि. १२/०८/२००६ रोजी मंदार गुजराथी यांने (मी) पहिल्यांदा सुरु केला. निमित्य होते ते फक्त जगात विखुरलेल्या चौल रेवदंडेकरांनी एकत्र यावे व ओळख वाढवावी. नियमित लोडशेडींग व यांत्रिकद्रुष्टया अत्यंत मागासलेल्या या गावांतील ओर्कुट वरील या परिवाराच्या सभासदांची संख्या सध्या २०० पलिकडे जाण्यास तयार आहे. यासाठी खालील मंडळींनी अहोरात्र हातभार लावला आहे व मला हे संकेतस्थळ काढण्यास सवड दिली. यांचा मी अत्यंत ऋणी आहे.

श्री. अतुल वासुदेव, श्री. नितीन उळे, श्री. अतुल पाटील. श्री. हितेश भट, श्री. प्रणय घरत, श्री. संकेत मोहिते, चि. श्रेयस मोहिते, सौ. ग्रीष्मा, श्री. तुषार ठाकुर, श्री. आशीष घरत व नवोदित श्री. कळसुलकर.
या परिवाराची पहिली सभा व ओळख समारंभ दि. २२/१२/२००७ रोजी, परिवाराचे मुख्य, श्रीयुत अतुल वासुदेव यांच्या चौलच्या घरी मोठ्या दिमाखात भरली.

उपस्थित मंडळी:
श्री. व सौ. अतुल वासुदेव व चि. मिखिल वासुदेव
श्री. व सौ. नितीन उळे व चि. विहान उळे
श्री. अतुल पाटील
श्री. हितेश भट
श्री. प्रणय घरत
चि. श्रेयस मोहिते
श्री. मंदार गुजराथी (yahoo messenger द्वारे उपस्थित).
या सभेविषयी श्री. अतुल पाटील यांच्याकडून हा विशेष लेख:
दि. २६/१२/२००७.




काल दुपारी मी घरी आलो ते चेउल च्या आठवणी घेउनाच. मित्राच्या कार ने परतीचा प्रवास करताना असे वाटत होते की अजून दोन दिवस रहता आले असते तर फार बरे झाले आसते पण ऑफिस वर रुजू होते अत्यंत आवश्यक होते म्हणुन काहिश्या हिरमुसलेल्या मनानेच गाडीत बसलो आणि आमचा परतीचा प्रवास सुरु ज्हाला. जशी गाड़ी पुढे जात होती तसे तसे माझे मन मागे मागे चेउल कड़े जात होते. मनाची हुरहुर वाढत होती. सकाळी १० वाजता मी अणि माझ्या मित्राची फयामिली मुंबईला परत निघालो. गाड़ी सुरु होती हवा मस्त ठंडगार होती. माझ्या डोळ्यासमोर चेउल ला येण्याचे आधीपासून चे प्रसंगा एखाद्या एल्बम प्रमाने येऊ लागले. ७ दिवस आधी पासून रिज़र्वेशन करूं ठेवले होते. एक एक दिवस मोजून घालवीत होतो मी. मग तो शनिवार उजाडला ज्या दिवसाची मी अतुरतेने वाट पाहत होतो. २२ तारीख दुपारी १:३० ऑफिस मध्ये बॉस ला टोपी लाऊंन मी सरळ ट्रेन पकडून चर्च गेट गठ्ले. आज माला ट्रेन जास्तच स्लो चलते असे वाटत होते. कारण माझे मन त्या ट्रेन पेक्षा जास्त वेगाने चेउल कढे धावत होते. चर्चगेटला उतरल्यावर टक्सी पकडून गेट वे ऑफ़ इंडिया गठाले अणि ३:३० च कैटामरिन चे तिकीट घेतले.
एक तास कसा बसा घालवायचा म्हणुन उगाचच इथे तिथे भटकत रहिलो. मग माला ती धुक्याचा पडदा बाजूला सारत किनार्याच्या दिशेने पुढे येताना दिसली. उतारू उतरल्यावर आम्ही लॉन्च मध्ये चढ़लो. १० मिनितात बरोबर ३.४० ला लॉन्च सुरु झाली. लॉन्च ने गजबजलेला समुद्र सोड्ल्यावर पुढे फक्त पाणी, समुद्र पक्षी, अणि लोच मधले माझे सहप्रवाशी इतकेच होतो. कॉलेज चे दोन ग्रुप होते त्यामुळे ४५ मिनिटं कशी गेली ते कळालेच नाही. मंडावा ला उतरल्यावर लग्बगिने उतरून बस पक्दाय्ची होती म्हणून आधीच लॉन्च च्या गेट वर जाऊँन उभा रहिलो. उतरल्यावर धवाताच बस जवळ जाऊँन सीट पडली ५ मिनिटात बस सुटली अणि माजा अलिबाग चा प्रवास सुरु झाला.
विंडो सीट असल्यामुळे आजुबाजुची हिरवीगार झाडे . कापलेली शेते, भाज्यांचे, फुलांचे मळे. हिरव्या पोखरनी, गावे, गजबजलेले नाके पाहत अलिबाग ला कधी पोहोचले ते कळालेच नाही. बस मधून उतरलो अणि पुढेच चेउल ला जाणारे सितारे उभे होते. सितारा पकडला तेव्हा थोडा थोडा अंधार होऊ लागला होता. अलिबाग सोडल्यावर सितारा गवाच्या दिशेने चालू लागला तसा थोडा माझा डोला लागला. झोप उडाली तेव्हा मी नागावला होतो माझ्या बाजूचे दोन जण तिथे उतरले. एक एक गाव मागे जात होते. आणि घराची ओढ़ वाढत होती. मुखरी गणपतिचे मंदिर पहिल्यावर वाटले प्रतीक्षा संपली. थोडाच वेळात चेउल नका आला. मला रामेश्वर ला उतरायचे होते पण मी मुद्दाम चेउल नक्यावर उतरलो कारण मला अतुल वसुदेवान्ना सलाम करूंन जायचे होते. वसुदेवांच्या बंगल्यात डोकाउन पाहिले तर त्यांची कार कुठे दिसली नहीं. मी तसाच पुढे गेलो. घरी आलो लोड शेडिंग असल्या करनाने पॉवर न्हव्ती. घरात घासलेट चे दिवे लावले होते.
झटकन मन लहानपणात गेले. मी लहान असताना इथे यायचो तेव्हा पॉवर न्हवती घरात. मला लहान असताना फफे चा दुधी हलवा फार पसंद होता. मी तिथे गेल्यावर माझ्या बहिणीचे पती माझ्या हातावर दुधी हलवा ठेवायचे. एकदा असाच गेलो होतो तेव्हा ते घरात न्हावते. मी बहिणीकडे दुधी हलवा मागितला तर ती म्हाणाली की ते नहीं आहेत नंतर देते. पण मी रडून गोंधळ घातला. की मला अत्ताच्या आता दुधी हलवा पाहिजे. माझे रडणे थांबत नवते. आई मला म्हणाली थाम्ब तुला मस्त दुधी हलवा आणून देते. तेव्हा आमच्या कड़े गाय होती आणि ती नुकतीच हगली होती. आईने काय केले, केळीचे पान घेतले. त्यात तो गरम गरम शेन घेतला मस्त केळीच्या पानात बांधला. आणि माझ्या हातात ती पुडी दिली (पहिला तो केलीच्या पानाताच दुधी हलवा द्यायचा) संध्याकाळी ७:३० ची वेळ होती त्यामुळे अंधार होता. आई मला म्हणाली हा घे गरम गरम दुधी हलवा. मी पण आधाश्यासरखा to गरम गरम दुधी हलवा तोंडात टाकला.
काय राव आता दुधी हल्व्याचा जागी शेन तोंडात गेल्यावर काय होईल ते सांगायला हवे का?याआआआआआआआआआआआआआआआआआआआआक् ऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊओक्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्बूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊउवाआआआआआआआआअक्पोटात होते न्हवते ते सगळे बाहेर आले होते. काय काय होते ते माहित नाही कारण अंधर होता.सागळे हसत सुटले होते पोट धरून अणि मी आपला त्यांच्या हास्याच्या कारंज्यात माझे याआआआआआआआआआआआआआआआआआआआआक् ऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊओक्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्बूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊउवाआआआआआआआआअक्मिसलुन् त्यांचे हास्याचे कारंजे आणखी वर उडवित होतो.शेवटी ओकुंन ओखुंन पोट दुखु लागल्यावर मी रडू लागलो. तेव्हा आजी माझ्या आईवर चिडाली. आणि तिला दम भरला. त्या दिवस पासून मी जो दुधी हलवा खायचा सोडला तो आजपर्यंत. दुधी हल्व्याचा वास जरी नाकात गेला की माला ओकारी येते.
असो आता मुल्पदावर येऊ, तर मी जेव्हा घरी पोहोचालो तेव्हा घरात अंधार होता. ५ मिनिट बसून मी घरामाग्च्या हौदावर गेलो. हौदत हट बुडवला तर पाणी खूप ठंड होते. प्रवासचा ताण घालविण्यासाठी आंघोळ करणे गरजेचे होते. गरम पानी ठेवले असते तर अतुल वसुदेवान्न्च्या घरी पोहोचायला वेळ झाला असता म्हणून थंड पाण्यातच आंघोळ करायचे ठरवले. कपडे उतरून हौदत मग बुडविला अणि म्हाणालो हरहर गंगे. सगळा ताण आणि मुम्बई एक मग मधल्या पाण्याने मी विसरलो.मी भसा भसा पानी उपासत होतो. आणि कुठून माझ्या आईचा आवाज येतो का ऐकत होतो. कारण मुंबईत असा भासा भासा पानी उपसाला की आई चे शब्द कानावर पडायचे "मेल्या डुकरा किती भासा भासा पानी उपस्तोस. सकाळी भरायला उठ म्हणजे समजेल" हे आठाऊँन मी आणखी १०/१२ मग अंगावर घेतले. एव्हाना अंधार चांगलाच पडला होता आणि गावची हावी हविशी वाटणारी शांतता सर्वत्र पसरली होती. पन तिचा आस्वाद मी ठिकपणे घेऊ शकत नवतो कारण भासा भासा पाणी अंगावर घेताल्यामुळे कनामध्ये कूऊऊउऊऊऊऊऊऊउ असा आवाज येत होता. मग जागेवर २/३ जम्प मारून मी ते कनाताले पानी बाहेर काढले. इतक्यात मागे केलीच्या बनात कस्स्स्स फस्स्स्स्स झाले. तिथून मी जी हनुमान जम्प मारली आणि पळालो ते सरळ घरात.
घरात गेल्यावर मस्त पातीचा चाहा आणि मारी बिस्किटे खाऊन अंगात दूसरा शर्ट चढवला आणि घर बाहेर पडलो ती मनात एक वेगालीच उत्सुकता घेउनाच. ऑरकुट जोइन केल्या पासून मी पहिल्यांदाच नेट मित्रांना भेटणार होतो. हा माझ्या साथी वेगळा अनुभव होता. अणि त्याचा मला पूरे पुर आनंद लुटायचा होता. जोशी आळीतून चालत असताना लहान पाणाचे सवंगडी मला आवाज देत होते मी त्यांना फक्त ओ देऊन पुढे सरकत होतो अणि सांगत होतो जरा घाईत आहे नंतर बोलू.पुढे भुत बंगाल्याजवळ आल्यावर अचानक एक कुत्रे माझ्या अंगावर भुन्कू लागले. मी त्या कुत्र्याला ना ना प्रकारे समजावून पाहिले, की रे बाबा तुझी कोणी घोडे मारले असेल त्याला जबाबदार मी नाहीं. मला सोड पन ते सोडेच ना. ते भुन्कतच होते. मग मी जरा वेगळ्या भाषेत त्याला समजवण्याचे ठरवले. "इरान्न्दा नारा पोंडा पाटा , वरवंता, खल्बत्ता" तर ते जास्तच जोरत भुकायला लागले. मला वाटले की तो विचारत असावा की याचा अर्थ काय? मी पण पटकन संगुन टाकले बाबा याचा अर्थ बाजूला हो मला अतुल वसुदेवांच्या घरी जायचे आहे. साहेबांचे नाव त्या कुत्र्याने ऐकले आणि काय चमत्कार ज्हाला माहित नाही, त्या कुत्र्याने सरल माझ्या पायावर लोटांगण घातले . कदाचित माफी मागत असावा. मला वाटले की अतुल साहेब या आळीत त्या धर्मेन्द्र सारखे फिरत असावेत ओरडत. "कुत्ते कमिने, मैं तेरा खून पी जाऊंगा" असो तर अतुल देवांच्या नावामुळे मी त्या कुत्र्याच्या तावडीतुन सुटलो आणि हसत हसताच अतुल सहेबांच्या गेट समोर आलो. आत बघितले आजुन गाड़ी आली न्हवती. तिथे एक गृहस्त होते. त्यांना विचारले की साहेब कधी येणार, त्यांनी सांगितले की आत्ताच फ़ोन आला होता. की ते पेण ला पोहोचलेत. मी जा मनातून खट्टू झालो कारण पेण म्हणजे अजुन १ तास लागणार होता. त्यांनी माझी विचारपूस केल्यावर माझ्या भाच्याची आणि त्यांची ओळख निघाली. दोघांचे सेल नोम्बर एकमेकांकडे होते. मी त्यांना सांगितले की साहेब आले की मला फ़ोन करा. आणि मी रामेश्वर मंदिराकडे सटकलो.

रामेश्वर मंदिराच्या पोखरणीवर संध्याकाळी बसण्यात वेगळाच आनंद असतो, पण तो आनंद आज येत न्हवता कारण समोर रस्त्यावर गाड्यांची खुप वर्दळ होती. सलग सुट्टी असल्या कारणाने वर्दळ खूपच वाढली होती. एरवी गाड्यांपेक्षा माणसे जास्त असायची रस्त्यावर, पण आज अगदी उलट होते त्यांचे तो हार्न देवाळाची शांतता भंग करत होते. लगेच मी भाच्याला फ़ोन केला आणि त्याला त्याझी मोटर बैक घेउन बोलावले. मलाही आईने कधी काम दिले होते ते आठवले. १० जण राहणार म्हणजे भाजी, मसाला, साखर आणि इतर वस्तु आणण्याची जबाबदारी मी त्यांच्या आधी पोहोचणार असल्या कारणाने माझ्यावर आली होती. आणि आमचे परतीचे एस.टी चे बुकिंग ही करायचे होते. बाईक वर बसून पार नका गाठुन जरुर ती खरेदी केली अणि रिटर्न बुकिंग करूंन टाकले. पोटात आग पडली होती, बजुलाच कांदा भज्जी चा खरपूस वास नाकात शिरला, वडा पाव अणि भज्जी गिळून होते तो पर्यन्त फ़ोन वाजला. वसूदेवांच्या घरून फ़ोन होता. साहेब आलेत तुम्ही या. लगेच गाडीवर बसून बंगला गठाला. आणि अधीरतेने गेट उघडून आत शिरलो. २५/३० फुटांवर बंगाल्याचा दरवाजा होता. पण इतक्या वेळात ही माझ्या डोक्यात नाना विचार आले. "आत कोण कोण असल? आपल्याला ओळखतील का? कसे असतील वसुदेव स्वभावाने? आत गेल्यावर काय बोलायचे? काय करायचे." च्या मारी टोपी, त्या अमिताभ आणि शाहरुख़ ला भेटायला गेल्यावर देखील एवढे विचार येत नाही मनात. असो विचार करताच पहिल्या पायरीवर पोहोचालो तोच आतून दोन आवाज आले. "या या पाटील साहेब. या!" या आवाजाने मी क्षणभर दाराताच थबकालो, आणि आवाज आलेल्या दिशेचा अंदाज घेत नजर टाकली आसता सुंदर नक्षीकाम केलेल्या लाकडाच्या च्या जाळीतुंन काही चेहरे दिसले. उत्सुक्तेने मी लांब धेंगा टाकत ती जाळी पटकन पार केली, बाजूलाच डायनिंग टेबल वर तीन ऑरकुट वीर गप्पा मारत बसले होते. पहिला नजरेस पडले ते वासुदेव, एक भारदस्त व्यक्तिमत्व, नंतर नितिन उळे, एकदम तरणा बांड गडी ज्यापुढे शाहरुख़, सलमान, आमिर पाणी भरतील असा मदनाचा पुतला. मग नजर गेली ती एका अनोळखी चेहेर्यावर, वसुदेवानी त्यांची ओळख करून दिली. तो हितेश होता. आपल्या स्वभावाताला अवखल पना लपवत त्याने माझ्याशी हस्तान्दोलन केले.
वसुदेवांचा मुलगा चि. मिखिल ही या गेट टू गेदर मध्ये सामिल होऊन आपल्या वडिलांनी प्लान केलेला गेट टू गेदर चांगला कसा होईल याकडे जातीने लक्ष देत होता. कोणाला काय हवे नको, ते पाहत होता. बाजूलाच हॉल मध्ये वासुदेव अणि उळेंच्या अर्धांगिनी मस्त गप्पा मारत बसल्या होत्या, बरोबर उळेंचा छकुला मस्ती करत होता, गोरा गोरा, कुरळे कुरळे केस, हातातून निसटून खाली खेलायचे होते बहुतेक त्याला. दोन दिवस आधीच त्याने पायाने फ्रीज़ खेचायचा भीम पराक्रम केल्यामुळे त्याच्या पायाला ७ टाके पडले होते. घरात येताना वाटले होते की घर एकदम वेल फ्रर्निश असेल. पण घरात आल्यावर माझे मत चुकीचे निघाले, या घरातील माणसानी आपल्या मनात अणि घरात गावपण जपले होते. वस्तु अगदी टाप टिप, जागच्या जागी ठेवलेल्या, देवघर, माजघर, डायनिंग हॉल, हॉल, सर्वत्र लाकडाचा भरपूर वापर केलेला, घराच्या स्वच्छतेतून घरातील व्यक्तिंचे मन कळते हे आग्दी खरं आहे, कारण पहिली भेट असतानाही वसुदेव अणि त्यांच्या धर्मपत्नी (यापुढे मी त्यांना "माउली" म्हाणेन) आमच्याशी दिलखुलास गप्पा मारत होते.
आता मी परत मुळपदावर येतो, तर अशी आमची पहिली गेट टू गेदर वसुदेवांच्या घरी सुरु असताना, कधी हलुवार जोक, तर कधी कोम्मुनिटी विषयी चर्चा चालू होती, बरोबर आमचे कोम्मुनिटी सुरु करणारे महागुरु, महाबिलांदर श्री मन्दार गुजराती ऑनलाइन ल्याप टॉप वरच्या वेब कैम वर हजर होते. कधी मी तर कधी उळे मंदार सह गप्पा मारत होतो, सोबतीला सहेबान्नी हॉट अणि सॉफ्ट ड्रिंक ठेवले होते त्याचा आम्ही सगळे आस्वाद घेत होतो, तोंडी लावायला लुसलुशीत काकडी आणि मस्त फरसाण होते. इतक्यात प्रणय घरत आले, ओलख परेड झाल्यावर ते ही आमच्यात सामिल झाले. हा हा, हू हू सुरूच होते, जसा जसा वेळ जात होता तस तसे एक एकताले विविध पैलू सगळ्यांसमोर उघडले जात होते. ग्रिष्मा, काका, आशीष, श्रेयस, तुषार या सगाळ्यांची आठवण काढली गेली, शेवटी काका पुराण आम्ही चघळायला घेतले, मला माहित असलेली काकांबद्दल ची माहिती मी सगाळ्यांना सांगितली. मजेत हसत खेलत वेळ जात होता, जसा वेळ जात होता तशी परकल्पनेची भावनाही आमच्या मनातून नाहिशी होत होती, आणि जन्माला येत होते एक वेगळेच आपुलकिचे नाते. "मोर झाडावर बसलेला असला की तो आपला सप्तरंगी चकाकणारा पिसारा मिटून घेतो, त्याच प्रमाने माणसानेही घरात वावरताना आपला मोठेपणा, अभिमान सर्व आकसून वावरावे" ही कुठेतरी लिहिलेली, वाचलेली ओळ मला आठवली, कारण अतुल वसुदेव आणि त्यांच्या पत्नी इतक्या सहज पणे आमच्यात मिसळत होत्या, की ते त्यांचे वय आणि आमचे वय विसरून गप्पा मारत होते, एकदा तर अतुल साहेब मला तोंडघशीच पाडणार होते. माझ्या भाज्या त्यांना दखावणार होते. माझ्या मनात आले आता मी मेलोच, हात जोडून वसुदेवांना विनंती केली तसे न करण्याबद्दल, काहीतरी बोलूंन लगेच मी विषय बदलला, त्यामुळे वाचलो, तेव्हाच मी बोटाला खडा लावला, हो लोक कानाला लावतात पण मी बोटाला लावला, की यापुढे एकही वातरट ई-मेल वासुदेवांना पाठवायचा नाही ! माझा मुम्बई हून येणारा मित्र एव्हाना आला असेल म्हणून मी वासुदेवांची त्याला इथे घेउन येण्याची बाबतची परमिशन घेउन त्याला आणायला घरी गेलो, १० मिनिटात परत आलो, येताना रस्त्यात तेच कुत्रं परत दिसलं, वाटले परत भुंकेल, पण नाही भुन्कले, वसुदेवांचा दरराच तसा असणार. परत येत असताना मी माझ्या मित्राला ऑरकुट कम्युनिटी आणि मिटिंग बद्दल थोडक्यात सविस्तर माहिती दिली. घरी पोहोचलो तो पर्यन्त पार्टी चंगालीच रंगात आली होती. काही वेळ परत मस्ती करून नंतर वासुदेव आम्हाला त्यांच्या टेरेस वर घेउन गेले. वर जाताना जिनाही लाकडाचा होता. वर गेलो आणि पाहिले तर मन अगदी बेधुंद झाले. टिपुर चांदणे पडले होते आणि त्या प्रकाशात वसुदेवांचा बंगला चंदेरी प्रकाशात न्हाहून निघत होता.



मी डोळ्याने चंद्रप्रकाश पीत, शरीराने गावचा मस्त ठंडीचा आस्वाद घेत होतो, चन्द्र नारळाच्या झावळीच्या आडून डोकावत होता. नाराळाच्या पाती एकमेकांवर घासून वेगाळाच ह्रिदम निर्माण करत होत्या. मला एक गाने आठवले तेव्हा " लव लव करी पात, जीव नाही थार्र्याला, लव लव करी पात" वासुदेव त्यांच्या बागेतील झाडांबद्दल भरभरून बोलत होते. ते आणि उळे बोलत होते आम्ही फक्त आइकत होतो. झाडांचा विषय संपल्यावर गाय, चौल-अलिबाग चा इतिहास या विषयावर वासुदेव आणि उळ्यांनी प्रकाश टाकला. इतक्यात वसुदेवांच्या खिशातील खेळने वाजले, जेवायला यायचा हुकूम आला होता. एव्हाना ११:३० वाजले होते १२ वाजता श्री. दत्त जयंतीचा दिवस उजाडणार होता, गप्पा मारण्यामध्ये वेळ कसा गेला ते कळालेच नाही, म्हणून पटकन आम्ही खाली जाऊन बसलो. व्हेज आणि नोन-व्हेज बिरयाणी होती जेवायला, काजुचा भरपूर मारा होता तिच्यात. मिसेस वासुदेव आपुलकिने बिरयाणी वाढत होत्या आणि आम्ही तितक्याच अपुलकीने बिर्याणीवर ताव मारत होतो. जेवण झाल्यावर जास्त वेळ रेंगाळत न बसता आम्ही घरचा रास्ता धरला कारण वासुदेव प्रवासतून आल्यापासून आराम न करता आमच्या सेवेत होते.

१. समाप्त.