Monday, December 31, 2007

३. चौल-रेवदंड्याची प्रसिध्द श्री. दत्त यात्रा (आवर्जुन वाचा)

श्री. दत्त जयंती निमीत्त आमच्या लाडक्या सदस्याकडुन हा आवर्जुन वाचण्यायोग्य लेख :
सादरकर्ते श्री. अतुल पाटील.



ओर्कुटवरील चौल रेवदंडेकरांची सभा संपुष्टात आल्यावर मी माझ्या मित्रासमवेत वसुदेवांचे घर मागे टाकून, आमच्या घराच्या दिशेने निघालो. दुसर्या दिवशी श्री. दत्त जयंती होती मी सकाळी लवकर उठून डोंगरावर जाणार होतो. घरी आल्यावर सगळ्यांना मी सकाळी लवकर उठण्याची सूचना करून टेरेस वर झोपायला गेलो. मस्त ठंडी पडली होती. वसुदेवानी वोडका देऊन स्वागत केल्यामुळे अंगात अजुन गरमी होती. चटई वर पडल्या पडल्या मस्त झोप लागली. सकाळी हलकीशी जाग आली ती दूरवरच्या कोंबडयाच्या आरवण्याने. घड्याळ पाहिले तर ४:३० वाजले होते. मी उठून बकिच्याना उठवले, कारण १० जनांच्या आंघोळी व्हायला वेळ तर होणाराच होता. भाच्याने मस्त शेगेडी पेटवली आणि त्यावर गरम पाण्याचे भांडे ठेवले. आज शेगेडी वरच्या घन घनत्या पाण्यात आंघोळ करायला मिलणार होती. अश्या पाण्यात आन्घोळ करण्याची मजा काही औरच असते. आणि ते पण सकाळी ५:३० वाजता. अंग मस्त शेकुंन निघते. मुंबईला गीज़र च्या पाण्याला याची टेस्ट नसते. (चित्रात: रामेश्वरी ही सुंदर दत्त मुर्ती)

डोंगरावर जायच्या ओढीने सगळे जण पटापट आंघोळ आटपून तयारीला लागले होते. ७ पर्यन्त सगळे तयार झाले. माझी आणि मामाची तयारी लवकरच झाली असल्यामुळे आम्ही दोघे रामेश्वर मंदिरात जायला निघालो. पाहाटेचा वेगळाच सुगंध हवेमध्ये होता, वसुदेवानी काल संगीताल्याप्रमाणे एक ड़ीप ब्रेथ मी घेतला, मन अगदी प्रसन्न, आणि उत्साही झाले. मी आणखी १०/१२ वेळा तसे केले, नाक एव्हाना मस्त ठंड पडले होते, असे करता करता देउळ गठाले आणि आत गेलो. आत उबदार होते. पुर्वीचे वास्तु-शास्त्र हे किती कल्पक होते, याचे हे देउळ एक प्रात्यक्षिक नमुना आहे. उन्हाळ्यात जेव्हा बाहेर अंगाची लाही लाही होत असते तेव्हा याच मंदिरात एसी सारखा ठंडावा असतो, आणि त्ता बाहेर एवढी ठंडी होती आणि मंदिरात मस्त उबदार वातावरण होते. या मंदिराचे आणखी एक विशेष, उत्तरायण असो वा दक्षिणायन; ९:३० ते १०:३० च्या दरम्यान देवाळाच्या गवाक्षातून सुर्याची किरणे बरोबर महादेवाच्या लिंगावर पडतात.आणखी एक म्हणजे पाणी हे समपतालित राहते हा नियम आहे. पण पोखराणीतले पाणी उन्हाळ्यात कमी असून, शिवलिंगाजवाळील पाणी तसुभर ही कमी होत नाही. मंदिर एकदम पेशावे कालीन बनावाटीचे आहे. मंदिराचे कोरिवकाम देखणे आहे. आत मोठा नगारा आहे, देवाची पालखी आहे, मंदिरात डोळे मिटून बसलो होतो आम्ही. असे वाटत होते एक वेगाळीच शक्ति संचाराते आहे अंगात. एक आणखी विशेषता सांगायची म्हण्जे, मंदिरात अगदी लहान आवाजात बोलले तरी तो आवाज खुप मोठा वाटतो व घुमतो. पूर्वी माइक नहव्ते तेव्हा किर्तनाच्या वेळी बुवांचे शब्द कानावर स्पष्ट पडावेत म्हणुन विशिष्ट बांधकाम शैलीचा उपयोग करून हे मंदिर बांधले असावे असे वाटते. (चित्रात: रामेश्वरी शिवलिंगाच्या सभोवताली हा प्रशस्त गाभारा)

काही वेळाने घरातील सगळे जण आले. त्यांचे देवदर्शन झाल्यावर आम्ही सगळे दत्ताच्या डोंगरावर जायला चौल नाक्याच्या दिशेने निघालो. पुन्हा वसुदेवांचा बंगला रस्त्यात आला. मी वासुदेव कुठे दिसतात का ते पाहिले पण गडाचे दरवाजे बंद असल्यामुळे कोणीच दिसले नहीं. सकाळच्या कोवळ्या सोनेरी सुर्यप्रकशात पांढरा-शुभ्र बंगला सोनेरी रंगात न्हाऊन निघाला होता. मला सहज काल रात्री चंद्र प्रकाशात पाहिलेला बंगला आठवला आणि नकळत लहानपणीचे बडबड गीत ओठावर आले. "असावा सुंदर चोक्लेटचा (वसुदेवांचा) बंगला, चंदेरी, सोनेरी चमचमता चांगला". थोड्याच वेळात आम्ही चौल नाक्यावर पोहोचलो, आम्ही १० जन होतो म्हणून एक पूर्ण सितारा बुक करून आम्ही निघालो. रस्त्यात नजर जाईल तिकडे निसर्गाने पाचू उधळले होते. मधोमध रस्त्याचा काला आखिव पट्टा पोटाखाली घेत सितारा धावत होता. ओळखीची घरे-मंदिरे मागे टाकत आम्ही १० मिनितात भवाले नाक्यावर पोहोचलो.


भवाले नाका मागे टाकून आम्ही मंदिराच्या दिशेने पुढे निघालो. रस्त्यात नेहमिची घरे, झाडे झुडपे दिसत न्हवती. रस्त्याच्या दुतर्फ़ा आज दाटी वाटी ने थाटलेली दुकाने दिसत होती. उसाच्या रस, खेळणी, वडापाव भज्जी, आकाश पाळणे, छोट्या मुलांच्या करमणुकीचे खेळ, अशी नानाविध दुकाने होती, सकाळी सकाळी त्यांची दुकानात माल रचान्याची लगबग सुरु होती. दुकाने मागे टाकून आम्ही डोंगराच्या जवळ पोहोचुंन डोंगर चढायला सुरुवात केली. जसजसे वर जात होतो तस तशी डोंगाराची ठंड बोचरी हवा अंगाला झोम्बत होती. इथेही निसर्गाने सर्वत्र पाचू उधाळले होते. पण आज गजबज जास्त होती. त्यामुळे आज मी या निसर्गाचा जास्त आनंद लुटू शकत नव्हतो. चढताना मध्ये एक जुने वडाचे झाड़ लागले. त्याच्या परम्ब्या खालपर्यंत आल्या होत्या. मला त्या परम्ब्या पकडून झुलण्याचा मोह झाला होता, पण आज डोंगाराच्या पयथ्या पासून वर पर्यन्त भिक्शुकांनी अतिक्रमण केल्यामुळे मोकळी जागा नव्हती. बिक्शुक ओरडत होते "हे दत्ता! दे दत्ता". २० मिनिटात आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचालो. मंदिर ५०/६० स्टेप्स दूर होते. पण इथे एवढी धक्काबुक्की आणि गर्दी होती की त्यामुळे रांग हा प्रकाराच इथे दिसत नव्हता.

रांगेत सगळे मध्ये मध्ये घुसत होते. त्यामुळे रांग संपण्याचे नाव घेत नव्हती. तिथे कुठेही मंदिरसमितिचे सभासद अथवा कार्यकर्ते दिसत नव्हते. माला खूप राग येत होता. शेवटी सहन झाले नाही तेव्हा मी सरळ मध्ये गुसनार्यांना अटकाव केला तर म्हणाले की आमची माणसं पुढे आहेत. मी म्हणालो त्यांच्या बोरोबर जर तुम्हाला वर जायचे असेल तर त्यांना खाली बोलवा, कारण मी कोणालाही अत पुढे जाऊ देणार नाही आहे. माझा आवाज ऐकून त्रासलेले भाविक ही माझ्या मागे उभे राहिले. आता रांग सुरळीत पुढे जात होती. मी मानत ठरवले होते की वर जर कोणी कार्यकर्ता भेटलाच तर त्याला चांगलेच सुनवायचे. रांग पुढे सरकत सरकत मंदिराजवळ आली, इथे तर धक्का बुक्कीचा कहरच होता. लहान मुले अणि महिला यांना खुप त्रास होत होता. कारण डोंगराच्या मागून येणारे भक्त इथे रांगेत घुसत होते. इथे मला हे वाचाकां साठी नमूद करावेसे वाटते की "इथले व्यवस्थापन अतिशय गलथान आहे. ना भक्तांची रांग ना प्रसाद देण्याची काही सोय. भयंकर गलका, प्रसाद फुले पायदळी तुडवले गेल्याने मंदिरात सर्वत्र जमलेला चिकथा. प्रस्तुत देवास्थानाच्या भक्तांच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नाही. परन्तु अतिशय दुर्दैवाची बाब म्हणजे शिस्त आणि भक्ति एकत्र नांदू शकते याची बर्याच ज़नांना समज नसते. हेच पुढे अनुचित घटनांना आमंत्रण देते.

No comments: