Monday, December 31, 2007

४. जिनकी कहानी, उन्हीकी जुबानी.

विशेष आभारी आहोत !
ह्या स्नेह संम्मेलनाच्या आयोजनकर्त्या खुद्द सौ. सुजाता वासुदेव यांच्याकडून हा लेख:
आमच्या घरी ओर्कुटची मंडळी येणार आहेत असे साहेबानी मला सांगीतल्यावर प्रथम वाटलेकी ही अनोळखी मंडळी कशी असतील? पण मग म्हटले ..पाहुया तर यांचे ओर्कुटयम कसे आहे ते ? तसे मी मंदारच्या आई-वडिलांना त्रिपुरी पोर्णिमेच्या दिवशी भेटले होते. तसेच प्रणयसह ही भेट झाली होती. मुलगा होतकरू व अज्ञेतला वाटला. ज्या दिवशी यांचे ओर्कुटया नमः एकत्र येऊन स्नेह सम्मेलन करणार हे जेव्हा मला कळले, मी नेहमी प्रमाणे त्यांच्या स्वागतसाठी तयार झाले, कारण आमच्या साहेबांचा बोलका व मोकळा स्वाभाव सतत कुणा कुणाशी नविन नविन ओळखी व गप्पा मारायचा आतोनात शौक.
माझे मात्र त्याप्रमाणे फ़ारच मोजके बोलणे. तसा अह्माला मुंबईहून निघवायास थोडा उशीर झाला. तरी ही मुंबईच्या ट्रैफिक जाम मधून वाट काढत आह्मी दिलेल्या वेळापेक्षा थोडेसे उशिरा चौलास पोहोचलो. गेल्या बरोबरच उळे दांपत्य आम्हाला भेटले व आम्ही नेहमी प्रमाणे त्यांचे आदरतिथ्य केल्यानंतर थोड्या वेळात सहेबांची ओर्कुट्वरील इत्तर सवंगडी येण्यास सुरवात झाली प्रत्येकाबरोबर साहेब माझी ओळख करून देत होते. मग ती मंडळी ऑरकुटच्या चर्चेत रममाण झाली. साहेबंचा ऑरकुट हा विषय मनाला व डोक्याला विरंगुळाचा असल्यामुळे मी त्यांच्या ह्या ओर्कुटायण बाबतीत जस्त्ता कधी पाहिले नाही. तरी ती मंडळी अल्यावर मला त्यांच्याबद्दल आपलेपणाच वाटला. सौ. उळे व मी खूप गप्पा मारल्या त्यांची आणि माझी इत्तर आमच्या मित्रांकडून ओळखी निघाल्या व आह्मी अधिक मोकळे पणाने बोललो. त्यांचा चिमुकला तर फारच छान होता.
त्या दिवशी रात्रीचे बंधन असल्यामुळे सर्वांना आपले ओर्कुटायान अवरते घावे लागले.

(क्रमश:)

No comments: